1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (22:47 IST)

कल्याण-डोंबिवली क्षेत्रात निर्बंध लागू

No lockdown but decision to impose restrictions Restrictions apply in Kalyan-Dombivali area MAHARASHTRA NEWS MUMBAI NEWS
मुंबईलगत असलेल्या कल्याण-डोंबिवली क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढला असल्यामुळे  प्रशासनाने आता निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. कल्याण-डोंबिवलीत आता अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सकाळी 7 ते सायंकाळ 7 वाजे पर्यंत दुकाने उघडी राहणार आहेत.  कल्याण-डोंबिवली भागात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्यानंतर मोठी रुग्ण संख्या वाढली. ज्यामुळे आयुक्तांनी तातडीची बैठक बोलावली होती. कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे लॉगडाऊन नाही मात्र निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
 
- शनिवार आणि रविवार पी 1 ,पी 2 नुसार दुकाने उघडी राहतील.
 
- खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांना सायंकाळी सात वाजेपर्यंत परवानगी 
 
- लग्न व इतर समारंभा मध्ये नियमांचे पालन करा. सकाळी ७ ते रात्री 9 पर्यंत कार्यक्रम आटोपते घेण्याचे आदेश
 
- बार आणि रेस्टॉरंट सायंकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार, होम डिलिव्हरीसाठी 10 वाजेपर्यंत परवानगी असणार
 
- महाशिवरात्रीनिमित्त कल्याण-डोंबिवली मधले सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद राहणार. नागरिकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करू नये.