रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (08:05 IST)

जयकुमार रावल यांची नाशिकच्या प्रभारी पदावरून गच्छंती यांच्या जागेवर माजी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती

नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जयकुमार रावल यांची नाशिकच्या प्रभारी पदावरून गच्छंती केली आहे. रावल यांच्या जागेवर माजी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशिक महापालिका निवडणुकांचा सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे आता भाजपने निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
 
गेल्या काही वर्षांपासून नाशिकची धुरा सांभाळणारे जयकुमार रावल यांना हटवून प्रभारी पदाची सूत्रे महाजन यांच्याकडे देण्यात आले आहेत. तर सह प्रभारीची जबाबदारी जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर नाशिक महानगरपालिका निवड समितीचे प्रमुख म्हणून गिरीश पालवे काम पाहणार आहेत.