संबंधित माहिती
- कोअर कमिटीवर आमदार नितेश राणे यांची निवड
- यूरिक ऍसिडच्या वाढीमुळे या समस्या उद्भवू शकतात, त्याची लक्षणे आणि ते कमी करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या
- 1983 विश्वचषक विजेता यशपाल शर्मा यांचे निधन
- पक्षाचे चिन्ह असते तर राहुल कलाटे 100 टक्के आमदार असते – संजय राऊत
- वामिका सहा महिन्याची झाली,अनुष्काने शेअर केले फोटो
वाढदिवशीच माजी आमदारचं निधन
अलिबाग उरण मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज पहाटे म्हणजे 15 जुलै रोजी 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. आजच त्यांचा वाढदिवस आहे. मागील 3 ते 4 वर्षांपासून ते आजारी होते. त्यावेळच्या झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि 2004 ते 2009 या काळात अलिबाग – उरण मतदार संघाचे ते आमदार होते.
रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश कॉग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.आज दुपारी 2 वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
