बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 जुलै 2021 (09:49 IST)

महाड चे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन

फोटो साभार सोशल मीडिया 
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ते 54 वर्षाचे होते.त्यांच्या निधनाचे वृत्त महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वरून देण्यात आले. मुंबईत रविवारी रात्री त्यांचे निधन झाले.
 
माणिकराव जगताप हे काँग्रेसचे विद्यमान रायगड जिल्ह्याध्यक्ष असून त्यांनी महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार निवडले गेले.

काँग्रेस पक्षाकडून त्यांना काँग्रेसच्या अधिकृत ट्विटरवरून श्रद्धांजली दिली जात आहे.आणि एक कर्तृत्वान नेते गमावल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहे.
 
आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर महाड येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.