रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 जुलै 2021 (08:05 IST)

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार,१ गोळी सापडली

भांडण सोडवल्याचा राग आल्याने जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर ७-८ जणांनी मिळून गोळीबार केला आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान,पोलिसांनी कुलभूषण पाटील यांच्या घराबाहेर बंदुकीची एक बुलेट मिळून आली आहे.
 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सकाळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पिंप्राळा भागातील दोन गटातील वाद सोडवला होता.याचा राग आल्याने एका गटाकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.हल्लेखोर हे चारचाकी वाहनातून आले होते.त्यांनी पिंप्राळा येथील कुलभूषण पाटील यांच्या घरावर गोळीबार केला.यात ते सुदैवाने बचावले असून ते आता तक्रार देण्यासाठी रामानंद नगर पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत.
 
जळगाव महापालिकेतील सत्तांतरात उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा मोठा वाटा होता. या पार्श्‍वभूमिवर थेट त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. 

उपमहापौर कुलभूषण त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली असता, दोन जणांमध्ये झालेला वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्याने महेंद्र राजपूत, मंगलसिंग राजपूत, बिऱ्हाडे यांच्यासह ७-८ जणांनी २ ठिकाणी हल्ला करीत सुमारे ५ गोळ्या झाडल्याचे सांगितले.याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.