गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 25 जुलै 2021 (10:33 IST)

निसर्ग आणि भोंगळ कारभाराचे फटके गेल्या काही वर्षांत जास्तच बसू लागले - उदयनराजे

"सरकारने मारले आणि आभाळ फाटले, तर दाद कुठे मागायची,असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. गेल्या दीड वर्षांत कोरोनाने जनता त्रासून गेली आहे.

"निसर्ग आणि भोंगळ कारभार यांचा फटका गेल्या काही वर्षांत जास्तच बसू लागला आहे," असं मत राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं.राज्यातील पूरस्थितीवर भाष्य करताना उदयनराजे ट्विट करून आपलं म्हणणं मांडलं.ते म्हणाले, सद्यस्थितीत आपण आपल्या कुटुंबीयांची काळजी घेऊन पूरग्रस्त भागातील मदतकार्यात सहभाग घ्यायला हवा.
 
मदतकार्य करत असताना जनतेला कमीत-कमी त्रास होईल, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी.अन्यथा त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.
 
सध्या संसदेच्या अधिवेशनानिमित्त मी दिल्लीत असलो, तरी माझं लक्ष कोकण,पश्चिम महाराष्ट्रावर आहे. या भागातील पूरस्थितीची माहिती केंद्र सरकारला दिली असून त्यांच्याकडून मदत मिळण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे,असं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं आहे.