शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (20:45 IST)

ट्विटरवरून फडणवीस यांचे राज्य सरकारला काही महत्वाचे सल्ले

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राज्य सरकारला काही सल्ले दिले आहत. “कोल्हापूर, सांगली भागात पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पाऊले टाकण्याची गरज आहे. अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारशी सतत पाठपुरावा करून समन्वय स्थापित केला पाहिजे”, असं फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
 
“कर्नाटकच्या काही भागात पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने नंतर अलमट्टी धरणातून कर्नाटकमध्ये विसर्ग योग्य दाबाने होण्यात अडचणी निर्माण होतात आणि कोल्हापूर व सांगलीच्या भागात पाणी पातळी वाढत जाते. त्यामुळे आत्ताच अधिकचा विसर्ग कसा करता येईल, याचा प्रयत्न करावा”, असं फडणवीसांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.
 
दरम्यान,  “कोकण, प. महाराष्ट्र विशेषत: महाडनजिक घडलेल्या घटना पाहता तातडीची मदत तसेच रोखीने आर्थिक मदत सुद्धा राज्य सरकारच्या वतीने लगेच दिली जावी.पिण्याचे पाणी, अन्न, कोरोनाचा कालखंड पाहता आरोग्य सुविधा या बाबी प्राधान्यक्रमात असल्याच पाहिजेत”, असं फडणवीसांनी नमूद केलं आहे.