बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जुलै 2021 (09:16 IST)

मग आता संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार का? चित्रा वाघ यांचा संजय राऊत यांना खोचक सवाल

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात  केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिलेल्या एका लेखी वक्तव्यामुळे केंद्र सरकावर टीकेची झोड उठत आहे. ‘ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात एकही मृत्यू झाला नाही’ असे लिखीत व्यक्तव्य त्यांनी संसदेत केले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राउत यांनी नाराजी व्यक्त करत सरकारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर आता संजय राऊत यांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे.
 
ऑक्सीजन अभावी एकही मृत्यू झाला नाही असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा असं संजय राऊत यांच म्हणणं आहे. मग, महाराष्ट्र सरकारने मे महीन्यात एकही मृत्यू ऑक्सीजन अभावी झाला नाही अस प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दिलयं. मग, राज्य सरकारवरही राऊतजी खटला भरणार आहेत का ? असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलाय.