1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जुलै 2021 (09:11 IST)

Guru Purnima गुरु पौर्णिमा चमत्कारी उपाय

guru purnima upay
गुरु पौर्णिमा पूजन विधी
गुरु पोर्णिमेला सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. नंतर विधीपूर्वक गुरु पूजा करावी. ज्यात फुळं-माळा, रोली, श्रीफळ, जानवं, दक्षिणा आणि पंचवस्त्र गुरु स्थानी न्यावे. आपल्या गरुंचे चरण स्वच्छ धुऊन त्यांची पूजा करावी. सामर्थ्यानुसार दक्षिणा द्यावी.
 
चमत्कारी उपाय
 
गुरु पौर्णिमेला पिंपळाच्या मुळात गोड पाणी अर्पित करावं. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि जीवनात भरभराटी येते. जीवनातील आर्थिक संकट दूर होण्यास मदत मिळते.
 
दांपत्य जीवनता समस्या येत असेल तर गुरु पौर्णिमेला पती-पत्नीने सोबत चंद्र दर्शन घ्यावं. या व्यतिरिक्त गायीला दूधाचं अर्घ्य द्यावं. असे केल्याने दांपत्य जीवनात मधुरता येते. 
 
या दिवशी तुलशीच्या झाडाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने देखील चमत्कारिक लाभ प्राप्त होतात.
 
आपल्या कुंडलीत चंद्र दोष असल्यास गुरु पौर्णिमेला चंद्र दर्शन करुन दूध, गंगाजल आणि अक्षता हे मिसळून चंद्राला अर्घ्य द्यावं. याने कुंडलीत चंद्र दोष नाहीसा होतो. नंतर ‘ॐ सों सोमाय नमः’ मंत्राचा जप करावा.