बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By
Last Updated : रविवार, 21 जुलै 2024 (10:00 IST)

Guru Shishya Relation गुरु आणि शिष्य म्हणजे काय?

Guru shishya
1. हिंदी भाषेत एक प्रचलित म्हण आहे की पानी पियो छान कर गुरु बनाओ जानकर। अर्थात मराठीत त्याचा अर्थ असा असावा की पाणी प्यावं गाळून, गुरु बनवा जाणून... अर्थात आपण खराब पाणी प्यायल्यावर आपल्याला उलट्या, अतिसार होऊन आपण आजारी पडू शकता. त्याचप्रमाणे, जर अज्ञानपणे कोणालाही गुरु मानले गेले तर आपले संपूर्ण आयुष्य आजारी पडेल आणि आपल्याला त्याबद्दल माहित देखील पडणार नाही आणि आध्यात्मिक विकास देखील थांबेल.
 
2. 'गु' या शब्दाचा अर्थ अंधार (अज्ञान) आहे आणि 'रु' शब्दाचा अर्थ प्रकाश ज्ञान आहे. जो अज्ञानाचा नाश करतो, ब्रह्मचा प्रकाश आहे तो गुरु आहे. म्हणूनच गुरू धर्मशास्त्रज्ञ असणे आवश्यक आहे. ब्रह्मज्ञानींच्या चेहर्‍यावर वेगळा तेज असतो. 
 
3. गुरू म्हणजे काय, कसे आणि कोण आहे हे जाणून घेण्यासाठी, त्यांच्या शिष्यांबद्दल जाणून घेणे देखील आवश्यक आवश्यक आहे आणि हे देखील की गुरूला जाणून घेतल्यास शिष्य ओळखता येतात. परंतु हे केवळ ती व्यक्तीच जाणून घेऊ शकते जेव्हा ती स्वत: गुरू किंवा शिष्य असेल. गुरु म्हणजेच जाणून घेतल्यावर शिष्याला दीक्षा देतात आणि शिष्यही तोच आहे जो गुरुला जाणून घेतल्यावर दीक्षा ग्रहण करतो.
 
4. हे जाणून घेणे महत्वाचे आहे की अखेर आपण ज्या व्यक्तीस गुरू बनवित आहोत, त्यांच्या विचार, चमत्कार किंवा आजूबाजूच्या भक्तांच्या गर्दीमुळे त्यांना गुरु मानत आहोत किंवा आपले व्यवसायिक संबंधांसाठी किंवा स्वार्थासाठी गुरु मानत आहात. असे असेल तर आपण योग्य मार्गावर नाही.
 
5. अती साधारण लोकं गुरु वाटत नाही कारण ते तामझाम सह आमच्यासमोर येत नाही. ते ग्लॅमर जगात नाही आणि ते आपल्यासारखे तर्क करणारे देखील नाही. त्यांना वाद घालणे तर मुळीच आवडत नाही. ते आपल्याला तर्क किंवा स्वार्थ या पातळीवर परीक्षेत उर्त्तीण होत नाही तोपर्यंत आणण त्यांना गुरु मानण्यास तयार नसता. परंतु अनेक अंधभक्त देखील असतात, तर अशा भक्तांचे गुरु देखील अंध असू शकतात. वर्तमान परिस्थितीत अंध गरुंची संख्या कमी नाही जे भक्त गोळा करण्याच्या कामात लागलेले असतात. भागवत कथा वाचन करणारे किंवा चार वेद किंवा फिर चार धार्मिक पुस्तकं वाचून प्रवचन देणारे कधी गुरु होत नसतात. पुस्तकं, चूर्ण, ऑडियो-व्हिडियो क्लिप्स, माळ किंवा ध्यान विकण्याची नोकरी देणारे कधीच गुरु नसतात.
 
6. अलीकडे तर एखादा व्यक्ती कोणालाही गुरु मानून त्यांचा घरात मोठा फोटो लावून पूजा करु लागतो, असं करण्यामागील कारण देखावा देखील असू शकतो. कथावाचक देखील गुरु आहे आणि दुष्कर्मी देखील गुरु आहे. आश्रमाच्या नावाखाली जमीन हडपणारे देखील गुरू आहेत आणि आपल्या मधुर वाणीने भक्तांचे मन जिंकणारे देखील गुरु बनत फिरतात. यांच्या धनबळ, प्रवचन आणि भक्तांची संख्या बघून प्रत्येकाला त्यांची ओढ लागते कारण या सर्वांमागे आर्थिक लाभ जुळलेले आहेत.
 
7. गुरु शोधणे सोपं नाही. योग्य गुरु देखील योग्य भक्तांच्या शोधात असतात. अनेकदा गुरु आमच्या ओवतीभोवती असून आम्ही त्यांना मठ, आश्रम, जंगल किंवा प्रवचनात शोधत असतो.
 
8. काही लोकांप्रमाणे शास्त्रानुसार आणि गुरु-शिष्य परंपरा अनुसार माहित पडतं की गुरु तो असतो जो आपल्याला निद्रेतून जागं करतं आणि मोक्षाच्या मार्गावर ढकलून देतं. तथापि, असे म्हटले जाऊ शकते की कोणीही जे काही शिक्षण देतं, गुरु आहेत. गुरु द्रोण यांनी धनुष विद्येची शिकवण दिली तर काय ते गुरु नव्हते? काय केवळ मोक्षाचा मार्ग दाखवणाराचं गुरु आहे? डॉक्टरी किंवा इंजीनियरिंग शिकवणारे गुरु नाहीत का?
 
9. तसं तर आमच्या जीवनात नकळत अनेक गुरु येतात ज्यात आमच्या पालकांची जागा सर्वोत्तम तर नंतर शिक्षक आणि इतर लोकांची जागा महत्त्वाची असते. परंतु प्रत्यक्षात गुरूचा संबंध शिष्याशी असतो आणि विद्यार्थ्याशी नाही. आश्रमांमध्ये गुरु-शिष्य परंपरा पाळली जात होती.
 
10. जैन धर्मात म्हटले गेले आहे की साधु होणे ही सिद्धी किंवा अरिहंतांची पहिली पायरी आहे. जर आपण साधुच नसला आणि गुरु बनून दीक्षा देण्याचा विचार करत असाल तर मग विचार करा हा कसला गुरु आहे. कबीर यांच्या एक दोहाची ओळ या प्रकारे आहे- - 'गुरु बिन ज्ञान ना होए मोरे साधु बाबा।' या ओळीने ज्ञात होतं की कबीर साधुंना म्हणत आहे की गुरुविना ज्ञान प्राप्त होऊ शकतं नाही.