शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 25 जुलै 2021 (10:25 IST)

तळीये गाव वसवण्याची जबाबदारी म्हाडा घेणार - जितेंद्र आव्हाड

रायगडमध्ये तळीये गावात दरड कोसळून कित्येक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. येथील अनेक घरं दरडीखाली गाडली गेल्याने हे गाव उद्ध्वस्त झालं आहे.
 
दरम्यान,येथील नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे,अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं.
 
या विषयी माहिती देताना ट्विट करत आव्हाड म्हणाले,"कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे.
 
"मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला की कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती," असं आव्हाड म्हणाले.