1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 25 जुलै 2021 (10:22 IST)

उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये

Uddhav Thackeray
कोकणातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवारी (25 जुलै) चिपळूणच्या दौऱ्यावर जाणार आहे.
 
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही कोकण दौरा याच दिवशी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
 
त्यामुळे उद्धव ठाकरे, नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूण परिसरात पाहणी करताना दिसतील.
 
मुख्यमंत्री ठाकरे हे सकाळी 11.30 वाजता चिपळूणमध्ये दाखल होती. तिथं चिपळूण बाजारपेठ आणि पूरग्रस्त भागाची पाहणी ते करतील. त्यानंतर मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेण्यासाठी जाणार आहेत.
 
तर,केंद्रीय मंत्री नारायण राणे रविवारी सकाळी 10 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने तळई गावची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. दुपारी 12 वाजता रायगडवरुन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील नुकसानाची पाहणी ते करणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजता ते खेडवरुन चिपळूणला पोहोचतील आणि पुढे रत्नागिरीकडे रवाना होतील. यावेळी राणे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही असणार आहेत.