बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 25 जुलै 2021 (17:04 IST)

धबधब्याच्या पाण्यात बुडून बाप लेकांचा दुर्देवी अंत

मावळ मधील कुसगावच्या धबधब्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची खळबळजन्य घटना आज घडल्याचे वृत्त मिळत आहे. या धबधब्याच्या पाण्यात दोन भाऊ गेले असताना त्यांना पाणी किती खोल आहे याचा अंदाज आला नाही आणि त्या पाण्यात गाळ साचल्याने ते त्या गाळ्यात अडकत गेले आणि बुडू लागले.त्यांनी स्वतःला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले नंतर त्यांनी आपल्या वडिलांना मदतीसाठी हाक मारली. हाक ऐकून त्यांच्या वडिलांनी देखील पाण्यात उडी टाकली मात्र ते देखील गाळ्यात अडकून बसले आणि पाण्यात बुडाले.
 
स्थानिक ग्रामस्थानिकांनी त्या तिघांचे मृतदेह बाहेर काढले.या घटनेमुळे दोन सख्ख्या भावांचा आणि त्यांच्या वडिलांचा अशा तिघांचा दुर्देवी अंत झाला.

पिराजी गणपती सुळे वय वर्ष 36 ,साईनाथ पिराजी सुळे वय वर्ष 13 आणि सचिन पिराजी सुळे वय वर्ष 10 अशी या मृतकांची नावे आहे.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.