रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मे 2018 (14:25 IST)

बेपत्ता दियाचा मृतदेह आढळला, रायगडमध्ये खळबळ

रायगड येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय चिमुकलीचा मृतदेहच आढळला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दिया जाईलकर असं या चिमुकलीचं नाव आहे. नेमका काय प्रकार झाला असावा असे पोलिस शोध घेत आहेत. दिया ही घरातून नेहमी प्रमाणे किराणा साहित्य आणायला गेली होती. मात्र ती घरी परतलीच नाही. मात्र चार दिवसांनी गावातीलच एका बंद घरात तिचा मृतदेह आढळला आहे. या चिमुकलीची हत्या ही राजकीय वैमनस्यातून झाली असावी असा अंदाज आहे. माणगाव तालुक्यातून दिया बेपत्ता झाली होती होती. जाईलकर कुटुंब माणगाव तालुक्यातील वावे गावात राहतात. दिया शुक्रवारी संध्याकाळी गावातील दुकानावर सामान खरेदी करायला गेली होती. तिला घरातील लोकांनी खूप शोधले मात्र तिचा कोठेही पत्ता लागला नाही. घाबरलेल्या कुटुंबाने दिया बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. दरम्यान, सोमवारी रात्रीच्या सुमारास गावातील एका बंद घरात दिया हिचा मृतदेह आढळून आला. यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.