शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (23:43 IST)

अहमदनगरात शॉक लागून चौघा भावांचा दुर्देवी मृत्यू

current shock
अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात येठेवाडी येथे विजेच्या ताराला चिटकून एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दर्शन, विराज, अनिकेत, ओंकार बर्डे असे या मयत चिमुकल्यांचे नावे आहेत. हे चौघे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकत होते. शाळा सुटल्यावर हे चौघे घरी गेले आणि घरा जवळ खेळात होते. दुपारी खंदरमाळवाडी गावातील वांदरकडा येथे छोट्या तळ्यात अंघोळीला गेले असता तळ्यावरील गेलेल्या वादळी वाऱ्याने तुटलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून चौघांचा दुर्देवी अंत झाला. चिमुकल्यांचा मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.  
 
Edited By - Priya Dixit