शुक्रवार, 9 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (20:28 IST)

सांगलीत गाडीने पेट घेतला, तरुणाचा होरपळून दुर्देवी मृत्यू

Car caught fire in Sangli
सांगली जिल्ह्यात हृदयाला पिळवून टाकणारी घटना घडली आहे. सकाळी नाशिक अपघाताची वार्ता समोर आल्यावर आता राज्यातील सांगली येथे अपघात होऊन वाहनाला आग लागली आणि त्यात वाहन चालक होरपळून मृत्युमुखी झाल्याची धटना घडली आहे. मकबूल गौसलाजम पटेल(25)रा.तालुका खानापूर बलवडी असे मयत युवकाचे नाव आहे. मयत मकबूलचा फळ आणि केळीच्या निर्यातीचा व्यवसाय असल्यामुळे तो कामा निमित्त बाहेर गेला आणि वाटेतच त्याच्या वाहनाचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या पलूस शहरात जुन्या सातारा मार्गावरील आंधळी फाट्याजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात गाडीने पेट घेतला असून वाहन चालकाचा होरपळून दुर्देवी मृत्यू झाला. या अपघाताची माहिती सकाळी मिळाली. पोलिसांनी अपघाताची नोंद करून मृतदेहाला शवविच्छेदनास पाठविले नंतर मृतदेह कुटुंबियांना दिले. 
 
Edited By - Priya Dixit