1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (11:11 IST)

खासगी बसला (Bus Fire) भीषण आग अपघातात 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 21 प्रवासी जखमी झाले

nashik
औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस व टँकर यांच्यात शनिवारी (दि.8) पहाटे सव्वा पाच वाजता झालेल्या भीषण अपघातात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने बस मधील जवळपास अकरा प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिक महापालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यासंदर्भातील प्राथमिक माहिती दिली आहे. यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना सदर अपघात घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.
nashik
घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन ते चार वाहने तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस भिजवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आले, त्यांनी उड्या मारल्या तर आगीमुळे प्रवासी जळून खाक झाले.
 
सदर अपघातानंतर बस 50 ते 60 फूट पुढे घसरत गेली तर टँकर 70 ते 80 मीटर पुढे जाऊन थांबला टॅंकरने रस्त्याच्या कडेला थांबला. सदर अपघातात बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बस मधून हलविण्यात आले. अपघात घडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी नवीन आडगाव नाक्यावर असलेल्या वाहतूक पोलीस चौकी देखील धाव घेतली तसेच पोलिसांना देखील कळविले मात्र पोलीस वेळेच घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
 
38 प्रवासी बसमध्ये होते. त्यापैकी 10 प्रवशी होरपळून ठार झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. 10 मृत झाले असून सर्व पुरुष असल्याचे प्रशासनाने सांगितले. यामध्ये एक मृतकाची कवटी फक्त आढळून आली. ती लहान मुलाची असू शकते असे पोलिसांनी सांगितले. काही प्रवाशांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 38 प्रवाशांमध्ये 10 महिला, 20 पुरुष, 08 बालके होती अशी माहिती देण्यात आली आहे.
 
कसा झाला अपघात?
औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस व टँकर यांच्यात शनिवारी (दि.8) पहाटे सव्वा पाच वाजता भीषण अपघात झाला. अपघातात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने जवळपास 10 प्रवासी होरपळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिक महापालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यासंदर्भातील प्राथमिक माहिती दिली आहे. यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना सदर अपघात घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.
 
घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन ते चार वाहने तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आले, त्यांनी उड्या मारल्या तर आगीमुळे प्रवासी जळून खाक झाले. सदर अपघातानंतर बस 50 ते 60 फूट पुढे घसरत गेली तर टँकर 70 ते 80 मीटर पुढे जाऊन टॅंकर रस्त्याच्या कडेला थांबला. सदर अपघातात बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बस मधून हलविण्यात आले. अपघात घडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी नवीन आडगाव नाक्यावर असलेल्या वाहतूक पोलीस चौकी देखील धाव घेतली तसेच पोलिसांना देखील कळविले मात्र पोलीस वेळेच घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 38 प्रवासी बसमध्ये होते. त्यापैकी 20 प्रवशी होरपळून ठार झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. 10 मृत झाले असून सर्व पुरुष असल्याचे प्रशासनाने सांगितले. यामध्ये एक मृतकाची कवटी फक्त आढळून आली. ती लहान मुलाची असू शकते असे पोलिसांनी सांगितले.
 
नाशिक अपघाताबद्दल जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सविस्तर माहिती दिली.
Edited by : Ratnadeep Ranshoor