गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (19:00 IST)

Nashik Bus Accident update : नाशिक बस अपघातात आजी -नातीचा दुर्देवी मृत्यू

nashik
नाशिकच्या औरंगाबाद मार्गावर मिरची हॉटेल जवळच्या चौकात पहाटे बसचा भीषण अपघात झाला त्यानंतर बसला आग लागली. या अपघातात अनेकांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातात 12 मृत्युमुखी झाले. या अपघातात अमरावतीहून शहापूरला कामासाठी निघालेल्या आजी आणि नातीचा मृत्यू झाला असून लक्ष्मीबाई मुधोळकर आणि कल्याणी मुधोळकर अशी त्यांची नावे आहेत. तर या अपघातात मृत्युमुखी झालेल्या पैकी चौघांची ओळख पटली आहे.

खरं तर प्रवाशी होरपळून गेल्याने त्यांची ओळख पटवणे हे मोठं आव्हान प्रशासनां समोर आले असून मृतांची ओळख पटविणासाठी मृतदेहांची डीएनए चाचणी करण्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असून मयतांपैकी चार ची ओळख पातळी असून ते यवतमाळ, वाशीम बुलडाणाचे प्रवाशी असल्याचे सांगितले जात आहे. अजय कुचनकुमार(16), रा. यवतमाळ, लक्ष्मीबाई नागुराव मुधोळकर(50)रा. लोणार बुलढाणा, कल्याणी आकाश मुधोळकर(3)रा.लोणार बुलढाणा, आणि उद्धव भिलंग (44)रा. मालेगाव वाशीम अशी मृतांची नावे आहे. 
 
या अपघातात मृत्युमुखी झालेल्या आणि जखमींना राज्य आणि केंद्र सरकार कडून मदत जाहीर करण्यात आली असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मयतांच्या वारसाला रुपये 2 लाख आणि जखमींना रुपये 50 हजारांची मदत करण्यात येईल. 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातात मृत्युमुखी झालेल्या प्रवाशांचा नातेवाईकांना रुपये 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींसाठी शासकीय खर्चाने उपचार करण्यात येत आहे. 
 
Edited By - Priya Dixit