शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 मार्च 2023 (13:01 IST)

लग्नावरून परतताना अपघातात चौघांचा मृत्यू

काळ कधी आणि कसा झडप घालेल हे कोणीही सांगू शकतं  नाही. लग्नसमारंभ म्हटले की सर्वत्र आनंदी वातावरण असते. मात्र कधी कधी या समारंभात गालबोट देखील लागते. नातेवाईकांच्या मुलाचे लग्न करून परत येताना अपघात होऊन चौघांचा मृत्यू झाल्याची घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात चलबुर्गा पाटी जवळ घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी पुण्याहून निलंगाचे बडूरकर कुटुंब नातेवाईकांकडे लग्नावरून गावी आपल्या वाहनाने निघाले. लग्नानंतर दोन वाहने निघाली असताना एकातनवरा नवरी होते तर दुसऱ्या वाहनांत व्हराडी होते .नवरा नवरी या अपघात सुखरूप असल्याचे समजले तर दुसऱ्या वाहनाचा अपघात गावी परत जात असताना औसा तालुक्यात चलबुर्गा पाटी जवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन पुलाखाली पालटून झाला. या अपघात चौघांचा जागीच मृत्यू झाला. अंश किरण बडूरकर, जय सचिन बडूरकर, अमर सचिन बडूरकर आणि प्रकाश कांबळे अशी मयतांची नावे आहेत. तर जान्हवी सचिन बडूरकर, यश किरण बडूरकर, गोदावरी सचिन बडूरकर आणि सचिन दिगंबर बडुरकर हे जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्युमुळे गावात शोककळा पसरली आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit