1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अमरावती , बुधवार, 29 डिसेंबर 2021 (16:36 IST)

मोठी दुर्घटना; वीजेचा शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू

four died
अमरावती येथील पी. आर. पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट येथील विजेच्या धक्क्याने बुधवारी (ता. २९) चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इन्स्टिट्यूटच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही दिवसांपासून रंगकाम सुरू होते. रंगकाम करण्यासाठी पंचवीस फुटांच्या एका लोखंडी शिडीचा वापर केला गेला. तेव्हा विजेचा हाय होल्टेजचा झटका लागल्याने चारही कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. 
 
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून महाविद्यालयीन प्रशासनासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरणाच्या कर्मचार्यां नी विद्युत पुरवठा खंडीत केल्यानंतर चारही कर्मचार्यांाचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. एकाच वेळी चार जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.