शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोलापूर , सोमवार, 25 एप्रिल 2022 (16:42 IST)

सोलापूरात ट्रकवर कार धडकून चौघांचा मृत्यू

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात 4जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातात जखमी झालेल्या पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या कारने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.  
 
कारने ट्रकला धडक दिली
या दिवसात दुपारच्या वेळी खूप उकाडा असल्याने ट्रकचालक दिवसा उन्हात वाहन चालवणे टाळतात आणि ट्रक रस्त्याच्या बाजूला लावतात. मात्र, इतर वाहनचालक कधी कधी घाईत असल्याने अशा विपरित घटना घडतात. असाच एक प्रकार सोलापुरात झाला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर ट्रकची समोरासमोर धडक झाली. त्यामुळे हा भीषण प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. त्यामुळेच वेळीच वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.