गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 जानेवारी 2023 (21:55 IST)

बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापुरातील चौघांचा अपघाती मृत्यू झाला

accident
बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापुरातील चौघांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आंध्रप्रदेशातील माध्यमांनी दिली आहे.
 
दरम्यान, पोलिसांनी दिलेली माहितीनुसार मागील दोन दिवसापूर्वी जुळे सोलापुरातील नऊ जण तिरूपती येथील बालाजीच्या दर्शनासाठी सोलापुरातून कारमधून गेले होते. बुधवारी तिरूपतीचे दर्शन घेऊन कनिपमकडे जात असताना अचानक कार दुभाजकाला धडकून अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रगिरी मंडळातील नायडूपेट-पूथलापट्टू मुख्य रस्त्यावर ही घटना घडली.
 
जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून तिरुपती रुईया रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पश्चिम डीएसपी नरसप्पा रुया रुग्णालयात पोहोचले. चंद्रगिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor