गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (13:42 IST)

विद्यार्थींनीना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी, राज्य सरकारचा निर्णय

state government decision
8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबियातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणात पूर्णशुल्क माफी देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकार ने घेतला असून पूर्ण शैक्षणिक वर्षांसाठी मुलींच्या शुल्कात माफी देण्यात येणार अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. राज्यातील मुलींचे शिक्षण जास्त प्रमाणात व्हावे या साठी  शिंदे सरकार कडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला  राज्यपाल रमेश बैस हे देखील उपस्थित होते. 
 
मुलींना जास्त प्रमाणात शिक्षण घेता यावे या साठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्षात 50 टक्के शुल्क माफी करण्यात आली होती आता शुल्कमाफी 100  टक्के म्हणजे मोफत करण्यात आली आहे. 
 
राज्य सरकारचा या निर्णयाचा फायदा राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना होणार आहे. या वेळी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत; राज्यपाल रमेश बैस यांनी  निर्देश दिले. 
 
 
 Edited by - Priya Dixit