शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (08:48 IST)

नाशिकला मंगळवारी भविष्य निधी पेन्शन अदालत

पेन्शन धारकांच्या तक्रारी, समस्याचे निराकरण करण्यासाठी नाशिकच्या भविष्य निधी कार्यालयात मंगळवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १ वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. तरी ज्या पेन्शन धारकांच्या पेन्शन संबंधी काही तक्रारी असतील त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रासह भविष्य निधी कार्यालय ,भविष्य निधी भवन , प्लॉट न पी ११, एम आय डी सी एरिया , सातपूर , नाशिक-४२२००७ या ठिकाणी उपस्थित राहावे, त्यांच्या सर्व तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्यात येईल. असे आवाहन क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अनिल कुमार प्रीतम यांनी केले आहे.