गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 मे 2021 (08:31 IST)

म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनची निर्मितीत गडकरी यांची मोलाची भूमिका

राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. या परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नानं वर्ध्यात म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनची निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये सध्या म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत वर्ध्यात या आजारावरील इंजेक्शन्सची निर्मिती होणार आहे. 
 
वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनी म्युकर मायकोसिसवरील एम्फोटेरीसीन बी इंजेक्शन तयार करणार आहे. या कंपनीला राज्याच्या एफडीएनं परवानगी दिली आहे. पुढील १५ दिवसांत कंपनी इंजेक्शनचं उत्पादन सुरू करेल. यामध्ये नितीन गडकरींनी मोलाची भूमिका बजावली आहे.
 
नितीन गडकरींच्या कार्यालयानं म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शनच्या निर्मितीबद्दल ट्विटरवरून माहिती दिली आहे. 'एम्फोटेरीसीन बीचं एक इंजेक्शन ७ हजार रुपयांना मिळतं. एका रुग्णाला ४० ते ५० इंजेक्शन्स दिली जात आहेत. त्यामुळे लोकांना ही इंजेक्शन्स सहज उपलब्ध होत नाहीत. वर्ध्यात तयार होणारं इंजेक्शन १२०० रुपयांत मिळेल. एका दिवसात २० हजार इंजेक्शनची निर्मिती करण्यात येईल,' अशी माहिती गडकरींच्या कार्यालयानं ट्विटरवरून दिली आहे.