गडकरी यां मोठी घोषणा, राज्यातल्या रस्त्यांसाठी तब्बल 2780 कोटी रुपयांचा निधी

nitin
Last Modified गुरूवार, 1 एप्रिल 2021 (16:20 IST)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा करत अनेक महत्वाच्या राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांच्या कामासंदर्भात तब्बल 2780 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील रस्त्याचे जाळे अधिक सक्षम होण्यास आता मदत होणार आहे. याबाबत त्यांनी
ट्विट केले आहे.


गडकरी यांनी प्रगतीका हायवे या हॅशटॅग अंतर्गत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रस्त्यांची पुन:बांधणी आणि विस्तारीकरण करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीसंदर्भात माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग
166 E वरील गुहार - चिपळूणला जोडणाऱ्या रस्त्याचे काम करण्यासाठी 171 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे. तसेच Tarere – Gaganbawda – Kolhapur
या राष्ट्रीय महारमार्ग 166 जीवरील रस्त्याच्या कामासाठी167 कोटी रुपये देण्यात आहे.
तसेच जळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग 753 J च्या विस्तारीकरणासाठी 252 कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा रस्ता दोन पदरी किंवा चार पदरी करण्यात येणार आहे. तर गडचिरोली तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 353सीवरील 262
किमी ते 321 किमीच्या अंतरामध्ये 16 लहान मोठे पूल बांधण्यात येणार असल्याची घोषणाही गडकरींनी केलीय. यासाठी 282 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

राष्ट्रीय महामार्ग 752 आयवरील वातूर ते चारथाना दरम्यानच्या रस्त्याच्या काम करण्यासाठी 228 कोटी रुपये तर तिरोरा ते गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 753 च्या दोन पदरी रस्त्याचं बांधकाम करण्यासाठी 282 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. तसेच तिरोरा गोंदियादरम्यानच्या राज्य महामार्गाच्या गांधकामासाठी 288.13 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग 753 अंतर्गत 28.2 किमीचा नवा रस्ता बांधण्यात येणार आहे.
नागपूरमध्येही आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ कॅम्पस असा उड्डाणपूल बांधण्यासाठी तसेच राष्ट्रीय महामार्ग 53 वर वाडी/एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उढ्डाण पूल बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी एखूण
478 कोटी 83
लाखांचा निधी मंजूर केला आहे. तर नांदेड जिल्ह्यातील येसगी गावामध्ये मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी 188 कोटी 69 लाख रुपये मंजूर करण्यात आलेत. हा पूल राष्ट्रीय महामार्ग 63 चा भाग असेल. आमगाव गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 543 साठी 239 कोटी 24 लाख रुपयांचा निधी तर राष्ट्रीय महामार्ग 361F च्या परळी गंगाखेडदरम्यानच्या कामासाठी 222 कोटी 44 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

राज्यातील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता

राज्यातील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता
महाविद्यालयामधील नियमित वर्ग दिनांक 20 ऑक्टोबर, 2021 पासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. ...

नांदेडच्या बड्या नेत्यावर ईडीच्या कारवाईचे चंद्रकांतदादांचे ...

नांदेडच्या बड्या नेत्यावर ईडीच्या कारवाईचे चंद्रकांतदादांचे संकेत
नांदेड: नांदेडमधील बड्या नेत्यावर ईडीची कारवाई होण्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष ...

बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय मुलगा जागीच ठार

बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय मुलगा जागीच ठार
नाशिक: इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते येथील दरेवाडी येथे सोमवारी सायंकाळी बिबट्याच्या ...

व्हाइटनर न दिल्याने नशेबाजाने केला खून; नाशिकची घटना

व्हाइटनर न दिल्याने नशेबाजाने केला खून; नाशिकची घटना
व्हाइटनरची नशा करणाऱ्या दोघांमध्ये झालेल्या वादातून एकाने चाकू पोटात भोसकून त्याच्या ...

लग्नानंतर महिनाभरातच नवरीने पूजेचे पैसे घेऊन ठोकली धूम

लग्नानंतर महिनाभरातच नवरीने पूजेचे पैसे घेऊन ठोकली धूम
लग्नाला महिना पूर्ण होताच नवरीने घरातून पलायन केल्याची घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ...