शनिवार, 6 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 नोव्हेंबर 2025 (18:44 IST)

गँगस्टर राजेश मिश्राच्या घरात रेड, 3 कोटी रुपये आणि ड्रग्ज जप्त, पोलिसांना फुटला घाम

Gangster Rajesh Mishra's house raided
प्रतापगडचा कुख्यात ड्रग्ज माफिया राजेश मिश्रा याच्या घरी छापा टाकल्यानंतर पोलिसांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. यूपीतील प्रतापगडमधील माणिकपूर भागातील रहिवासी राजेश मिश्रा (45) हा वर्षानुवर्षे तुरुंगातून ड्रग्ज तस्करीचे रॅकेट चालवत होता.
आतापर्यंतच्या छाप्यात पोलिसांनी राजेश मिश्राच्या घरातून 3 कोटी रुपये रोख आणि लाखो किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राजेश मिश्रा आणि त्याच्या टोळीतील सदस्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्डची चौकशी केली जात आहे. तो तुरुंगातून कसा आणि कोणाच्या मदतीने आपला व्यवसाय चालवत होता याचा तपास करण्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. लवकरच या प्रकरणात आणखी अटक होऊ शकते.