शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 एप्रिल 2022 (17:15 IST)

करारा जबाब मिलेगा! राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी मनसे आक्रमक

raj thackeray
येत्या 12 एप्रिल रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात सभा होणार असून या सभेपूर्वी अनेक घडामोडी मनसेत घडल्याने 12 एप्रिल रोजी होणाऱ्या या सभेत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार या कडे सर्वांचं लक्ष वेधत आहे. या पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी मुंबईत झालेल्या सभेत मशिदीवरून भोंगे उतरवण्याबाबत वक्तव्य दिले होते. त्याचे राजकीय पडसाद देखील उमटताना दिसून आले. आता या सभेत राज ठाकरे काय बोलणार याचा कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 12 एप्रिल रोजी ठाण्यात होणाऱ्या या सभेसाठी मनसेने जय्यत तयारी सुरु केली आहे. या सभेपूर्वी मनसेकडून एक टिझर देखील रिलीझ करण्यात आलं आहे. या टिझर मधून सर्व टीकांना करार जबाब राज ठाकरे देण्याचं सांगितले आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. 

या मनसेच्या टिझर मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार,शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रया दाखविण्यात आल्या आहेत.  
 आता महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असून त्यापूर्वी मनसे आक्रमक झाली आहे. या पूर्वी मनसे नेते अमेय खोपकर यांनी देखील 12 तारखेच्या सभे संबधी ट्विट केले होते. त्यात त्यांनी शिवतीर्थावरील सभेने तुमची झोप उडाली आता ठाण्यात  12 तारखेच्या उत्तरासभे नंतर तुमचं काय होईल ?  आता या 12 एप्रिल रोजी ठाण्यात राज ठाकरे काय म्हणतात हे जाणून घेण्याकडे सम्पूर्ण राज्याला उत्सुकता लागली आहे.