बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :नाशिक , रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (20:45 IST)

स्वयंपाक करतांना चुलीवर ओढणी पडल्याने भाजलेल्या मुलीचा मृत्यू

स्वयंपाक करताना चुलीच्या जाळावर ओढणीचा पदर पडल्याने भाजलेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कोमल राजू रगडे (वय 17, रा. पगारे मळा, महाराष्ट्र शाळेच्या पाठीमागे, नाशिक) असे भाजल्याने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. कोमल रगडे ही दि. 2 जून रोजी सायंकाळी 6 वाजता राहत्या घरी स्वयंपाक करीत होती. त्यावेळी तिच्या ओढणीचा पदर चुलीवर पडल्याने तिचे दोन्ही हात 59 टक्के भाजले होते.
तिला पुढील औषधोपचारासाठी तिची आई वंदना रगडे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते; मात्र उपचार सुरू असताना या मुलीला काल रात्री 8 वाजता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.