शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 2 मार्च 2024 (07:51 IST)

प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रेयसी प्रियकराचे बनावट प्रोफाईल बनवून त्याचे अश्लील फोटो व्हायरल केले

प्रेमसंबंध संपुष्टात आल्याचा राग मनात धरून एका तरुणीने प्रियकराचे बनावट प्रोफाईल बनवून त्याचे अश्लील फोटो व्हायरल करून त्याचा विवाह मोडण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी शंकर कारभारी भुसनर (वय 65, रा. पंचवटी, नाशिक) यांच्या मुलाचे पंचवटीतील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. हे प्रेमसंबंध तोडल्याचा राग मनात धरून आरोपी तरुणीने बनावट मेल आयडीद्वारे व मुलाचे व्हॉट्सॲप, फेसबुक प्रोफाईल, तसेच मुलीच्या नावे बनावट इन्स्टाग्राम प्रोफाईल बनवून त्याद्वारे चॅटिंग व स्टेटसद्वारे मुलींचा व इतर नातेवाईकांचा एका कार्यक्रमातील फोटोतील चेहरा घेऊन अश्लील फोटोशी मॉर्फ करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे अश्लील फोटो प्रसारित केले, तसेच प्रियकराच्या संपूर्ण कुटुंबाची व नातेवाईकांची बदनामी केली.
 
एवढेच नव्हे, तर फिर्यादीच्या मुलाचा नियोजित असलेला विवाह मोडण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात आरोपी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंद्र करीत आहेत.

Edited by: Ratnadeep Ranshoor