गोकुळ दुधाच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना दिलासा
महागाई दिवसेंदिवस वाढतं आहे. शेतकऱ्यांना गणेशोत्सवात दिलासा मिळाला आहे. गोकुळ दुग्ध संघाने शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिले आहे.
दुग्ध संघाने गाई आणि म्हशीच्या दुध खरेदी दरात प्रतिलिटर 1 रुपयाने वाढ केली आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाली आहे. या मुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
म्हशीच्या दुधात 1 रुपयाने वाढ केली असून आता म्हशीचे दूध 50.50 रुपये लिटर ऐवजी 51 रुपये लिटर मिळणार आहे. तसेच गायीचे दूध प्रतिलिटर 30 रुपयांऐवजी 33 रुपये मिळणार आहे. ही दरवाढ तात्काळ लागू करण्यात आली असून याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
Edited By - Priya Dixit