गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 जून 2023 (15:59 IST)

Gondia : विहिरीत उतरलेल्या चौघांचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू

गोंदियातील तिरोडा तालुक्यातील सरांडी येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. बुधवारी सकाळी घरगुती विहिरीत उतरलेल्या चौघांचा विजेचा शॉक लागून दुदैवी मृत्यू झाला. हा अपघात सकाळी 9 वाजेच्या सुमारास झाला. 
घरगुती विहिरीतील मोटारीचा पंप दुरुस्त करण्यासाठी हे चौघे उतरले होते. 

विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. खेमराज गिरिधारी साठवणे, प्रकाश सदाशिव भोंगाडे, सचिन यशवंत भोंगाडे, आणि महेंद्र सुखराम राऊत अशी मयतांची  नावे आहेत. 

हे सर्व घरगुती विहिरीतील मोटार दुरुस्तीसाठी एकापाठोपाठ विहिरीत उतरले असताना चौघांना विजेचा शॉक  लागून दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 
 
Edited by - Priya Dixit