रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (18:25 IST)

नागपुरात मोबाईलच्या दुकानावर दरोडा टाकून 40 लाखांचा माल लंपास

नागपुरात चोरट्यांनी एका मोबाईल शॉप मध्ये रात्रीच्या वेळी दरोडा टाकून 35 ते 40 लाख रुपयांचे मोबाईल पळवले. या चोरटयांनी मोबाईल गोणीत भरून नेले. 

तीन चोरटे काल रात्री एका मोबाईलच्या दुकानात शिरले आणि महागड्या मोबाइलवर हात साफ केला. सम्पूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दुकानाचे शटर सीसीटीव्ही मध्ये बंद असल्याचे दिसून येत आहे. 
नंतर एक चोरटा येतो. मग दुसरा नंतर तिघे मिळून दुकानाचे शटर उचलण्याचा प्रयत्न करतात.काही तरी आवाज आल्यावर ते तिघे लपून बसतात. 

नंतर तिघे येतात आणि दुकानाचे शटर वर करून एक जण आत शिरतो आणि बाकी दोघे बाहेरच थांबतात. नंतर चोरटा मोबाईल घेतो आणि एका गोणीत भरतो. सुमारे 80 मोबाईल त्याने गोणीत भरले आणि गोणीला दुकानाच्या शटर जवळ ठेवतो. नंतर काही मोबाईल पाठीवरील असलेल्या बॅगेत भरतो नंतर तिघे तिथून पळ काढतात.
या घटनेची माहिती दुकानदाराला सकाळी आल्यावर मिळाली 80 ते 100 मोबाईल सुमारे 30 ते 40 लाखाचे असण्याची शक्यता आहे. सदर घटना पहाटे 4:15 वाजेच्या सुमारास घडली आहे. 
Edited by - Priya Dixit