रविवार, 10 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मार्च 2024 (08:57 IST)

बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध

eknath shinde
बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ठाणे येथील मॉडेला मिल कंपाऊंड, वागळे इस्टेट, चेक नाका येथे कौशल्य विकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज या मेळाव्यातून अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. रोजगार तरुणांना तसेच कुटुंबासाठी महत्वाचा असतो. आज या मेळाव्यात 30 हजार तरुणांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात सरकारच्यावतीने 6 हजार तरुणांना रोजगार दिला जात आहे. नमो महारोजगार मेळाव्यामुळे तरुणांमध्ये उत्साही वातावरण आहे. देशातील पहिले संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधनीचे आज उद्घाटन होत आहे. या केंद्रातून दरमहा 2 हजार मुलांना स्वच्छतेविषयक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शासन सर्वांसाठी काम करत आहे. दावोस मधून 3 लाख 73 हजार कोटींचे करार झाले. महाराष्ट्र अनेक विभागात पुढे आहे. राज्यात स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने अंतर्गत 700 दवाखाने सुरू केले. सर्वसामान्य माणसाच्या गरजा काय असतात, त्यांचे दुःख काय असते, याची मला माहिती आहे. म्हणूनच माझ्या इतर सहकारी मंत्र्यांच्या सहकार्याने हे शासन सर्वसामान्यांसाठी काम करीत आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor