सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑक्टोबर 2023 (13:02 IST)

राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

raj thackeray
राज्यातील टोलविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुरुवारी दुपारी चार वाजता मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार आहेत. या भेटीवर सर्वांचे लक्ष आहे.
 
जसे की माहित आहे ठाण्यातील 5 टोल नाक्यांवरील दरवाढी विरोधात मनसेच्या वतीने उपोषण करण्यात आले होते आणि उपोषण मागे घेताना राज यांनी मुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवणार असे सांगितले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज ही भेट होणार आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील टोलनाक्यावरील मनसेचे आंदोलन चर्चेत आहे. मनसेचे अविनाश जाधव यांनी मुलुंड-ठाणे टोलचे दरवाढी विरोधात आमरण उपोषण सुरु केले होते मात्र 4 दिवसांनी राज ठाकरे यांनी अविनाश जाधवांची भेट घेत उपोषण आपलं काम नसून या प्रश्नी मुख्यमंत्री यांची भेट घेणार असे आश्वासन दिले होते.
 
सह्याद्री अतिथिगृहावर दुपारी चार वाजता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात टोलबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. आज होणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरेंच्या भेटीकडे राज्याचे लक्ष आहे.
 
आजच्या बैठकीत होणार्‍या चर्चेची माहिती स्वत: राज ठाकरे माध्यमांना देणार असून जर सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलले गेले नाही तर मनसे कार्यकर्ते टोलनाक्यावर उभे राहून वाहने सोडतील तर जिथे वाहने सोडली जाणार नाही तिथे टोलनाके जाळू अशा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.