शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 8 जुलै 2023 (11:52 IST)

CM एकनाथ शिंदेंना धक्का!

eknath shinde
CM Eknath Shinde महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री दोन तास चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा आवास येथे एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. रात्री सव्वा अकराच्या सुमारास फडणवीस वर्षाला पोहोचले. त्यानंतर रात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी फडणवीस तेथून बाहेर आले.
 
 विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना नोटीस बजावली आहे. तसेच ठाकरे गटाच्या 14 आमदारांनाही म्हणणं मांडण्यासाठी नोटीस धाडण्यात आलेली आहे.
 
शिवसेनेच्या40 आमदार व ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्रतेसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी नोटीस जारी करण्यात आलेली असून विधीमंडळाकडून नोटीस जारी करताना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली.अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. निवडणूक आयोगाकडून विधीमंडळास शिवसेनेच्या घटनेची प्रत प्राप्त झालेली असून शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करून लवकरच निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.