1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 17 सप्टेंबर 2023 (10:45 IST)

CM एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा: मराठवाड्यासाठी शिंदेंनी दिलं तब्बल ‘इतक्या’ कोटी रूपयांचं पॅकेज

CM Eknath Shindes big announcement
छत्रपती संभाजीनगर : राज्य मंत्रिमंडळाची तब्बल सात वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर येथे बैठक पार पडली असून या बैठकीत मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिंदे सरकारने विविध कोटींच्या योजनांची खैरात वाटली आहे. तब्बल ५९ हजार कोटी रूपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यांसाठी दिला आहे.
 
मराठवाडा स्वातंत्र्यलढ्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आज (१६ सप्टेंबर) रोजी औरंगाबाद येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेण्यात आली. त्यासाठी राज्यातील सर्व मंत्र्यांसह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि संपूर्ण प्रशासन आज छत्रपती संभाजीनगरमध्ये  एकत्र आले आहे. कॅबिनेट बैठक होण्याआधीच विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टिकास्र सोडलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे कोणत्या योजना आणणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून होतं. दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
 
यापूर्वी २०१६ मध्ये मराठवाड्याच्या समस्यांबाबत संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली होती, तर २००८ मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मराठवाड्यात एकदा मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. म्हणजे १६ वर्षात मराठवाड्यात मंत्रिमंडळाच्या दोनच बैठका झाल्या आहेत.
 
दरम्यान आज झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. एकनाथ शिंदे म्हणाले, मराठवाड्याला न्याय देण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. मराठवाडा मोठी झेप घेत आहे. वर्षभरात आमच्या सरकारने घेतलेले निर्णय सर्वसामान्यांचे हीत डोळ्यासमोर ठेऊण घेतले. आतापर्यंत शेतीला पाणी पाहिजे म्हणून ३५ सिंचन प्रकल्पाला आम्ही मान्यता दिली. ८ लाख हेक्टर जमीन यामुळे ओलीताखाली आली. आम्ही फक्त घोषणा करत नाहीत तर अंमलबजावणी करतो.
 
आम्ही सरकारमध्ये आलो तेव्हा आम्ही पहिला विषय मराठवाड्याची वाहून जाणाऱ्या पाण्याला वळवण्याचा निर्णय घेतला. समृद्धी महामार्ग मराठवाड्याला लागून जातो, त्याचा फायदा मराठवाड्याला होईल, असे शिंदे म्हणाले.  
 
आज काय निर्णय झाले -
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सिंचनासाठी साखळी सिमेंट बंधारे तसेच अंबड प्रवाही योजना दिंडोरी जिल्हा नाशिक. आज १४ हजार कोटी रुपयांचे निर्णय फक्त सिंचनासाठी घेतले.
 
पश्चिमवाहिनी नद्याद्वारे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यावर १३ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
 
३५ सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली
सार्वजनिक बांधकामविभागामध्ये १२ हजार ९३८ कोटी ८५ लाख दिले आहेत.
महिला सक्षमीकरणावर बैठकीत चर्चा झाली
आदर्श पतसंस्थेच्या संचालकांच्या प्रॉपर्टी जप्त करु
 
कृषी, क्रीडा. पर्यटनासह सर्व विभागाला निधी
 
मराठाड्याती ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणार, यासाठी २८४ कोटींचा निधी लागले.
 
पुणे संभाजीनगर मार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम बसवणे - १८८ कोटींचा निधी
 
 पैठणमधील संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्यासाठी १५० कोटींचा निधी जाहीर करण्यात आला
 
शनी देवगाव उच्च पातळी बंधारा - २८५ कोटी
 
परभणीच्या पाथरीतील साईबाब तीर्थक्षेत्र विकास आराखडा - ९१.८० कोटी
 
औढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा विकास - ६० कोटी
 
मराठवाड्यात दूध उत्पादनाला वेग देण्यासाठी ३ हजार २२५ कोटी रुपयांची निधी

 वैयक्तिक बचत गट शेतकरी उत्पादक कंपन्यांना किमान ५ आणि कमाल १० दुधाळ जनावरांचे वाटप
 
एका गावात किमान ५० दुधाळ जनावरांचे अनुदान तत्त्वावर वाटप
मराठवाड्यातील १ हजार ३० कि मी लांबीच्या ३१ रस्त्यांची सुधारणा

Edited By - Ratnadeep Ranshoor