रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 (15:58 IST)

Accident : बसची दुचाकीला धडक! दुचाकीस्वाराला 30 फुटांपर्यंत फरफटत नेलं

death
राज्य परिवहन मंडळाच्या  बसने एका दुचाकीस्वाराला धडक दिली त्यात दुचाकीस्वार खाली पडला आणि वेगाने धावणाऱ्या या बसने दुचाकीस्वाराला 30 फुटापर्यंत फरफटत नेण्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यात खंडाळा बस स्थानकावर शुक्रवारी सकाळी 9:30 वाजेच्या दरम्यान घडली आहे. मुक्तार रज्जाक शेख (44)असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. 

मुक्तार खंडाळा सर्कल मधून जात असताना नाशिक- छत्रपती संभाजीनगर बस भरधाव वेगाने जात असताना बसने मुक्तारच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. आणि दुचाकीस्वाराला फरफटत नेले. या अपघातात मुक्तारच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली त्याला रुग्णालयात नेण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. 

अपघातानंतर स्थानिकांनी बस चालक आणि वाहकाला चांगले चोपले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस पुढील तपास करत आहे.  
 
Edited by - Priya Dixit