गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 सप्टेंबर 2023 (17:52 IST)

Beed : ज्येष्ठ साहित्यीक श्रावण गिरी यांचं अपघाती निधन

Beed : ज्येष्ठ साहित्यिक निवेदक प्राध्यापक श्रावणगिरी यांचे रस्ता ओलांडताना वाहनाखाली येऊन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना औरंगाबादच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली आहे. श्रावणगिरी हे औरंगाबाद येथे कामा निमित्ताने आले होते. काल रात्री ते  काम आटपून कर्जतला जाण्यासाठी निघाले असताना रास्ता ओलांडताना त्यांना एका ट्रॅव्हल बसची धडक लागून त्यांच्या पायावरून वाहन गेल्याने ते खाली पडले त्यांना खाली पडलेले पाहून काही लोकांनी त्यांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने साहित्य जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 
मूळचे बीड जिल्ह्यातील घाटनांदूर गावातील प्राध्यापक श्रावण गिरी हे कर्जतच्या एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. काही कामानिमित्त ते औरंगाबादला आले होते. काम आटोपून कर्जतला परतताना त्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका ट्रॅव्हल्स बसने धडक दिली त्यात ते खाली पडले त्यांच्या पायावरून खाली पडले चौकात असलेल्या काही युवकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit