गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (20:11 IST)

नाशिक : भुजबळ यांच्या वक्तव्या विरोधात निदर्शने

येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्या विरोधात शरद पवार गटाने तहसील कार्यालयावर सोमवारी निदर्शने केली. बीड येथे आयोजित राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या विरोधात वक्तव्य केले. 
 
बीड येथे झालेल्या सभेनंतर येवल्यातील शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी भुजबळ यांनी केलेले वक्तव्य निंदनीय असून भुजबळांना उपमुख्यमंत्रीपदा बरोबरच अनेक मंत्रीपद दिलेले असतांना भुजबळ यांनी शरद पवार यांच्या विरोधात केलेली टिका मान्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर सदरची निदर्शने केली. शरद पवार गटाचे नेते माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोटरसायकल व्दारे तहसील कार्यालयावर जात तेथे निषेधाचे निवदेन तहसिलदारांना दिले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor