गुरूवार, 12 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 27 ऑगस्ट 2023 (15:42 IST)

HSC SSC Repeater Exam Result : दहावी- बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या सोमवारी येणार

HSC SSC Repeater Exam Result :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान या विषयांची ऑनलाईन परीक्षा 9 व 10 ऑगस्ट रोजी घेण्यात आली.राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्या रोजी बारावीची होणारी परीक्षा 11 ऑगस्ट आणि दहावीची परीक्षा 2 ऑगस्ट रोजी घेण्यात आली असून 28 जुले ला होणारी दहावीची परीक्षा 3 ऑगस्ट रोजी घेण्यात आली असून या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे सोमवारी 28 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. 
 
या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवार 28 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. अशी  माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. 
 
या परीक्षेचा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर सोमवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. तिथे निकाल पाहून विद्यार्थ्यांना प्रिंट काढता येईल.
 
ऑनलाईन निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसा पासून गुणपडताळणी, पुनर्मुल्यांकन करण्यासाठी मंडळाकडे अर्ज करता येणार आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना http://verification.mh-ssc.ac.in तर बारावीच्या विद्यार्थ्यांना http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर (HSC SSC Repeater Exam) अर्ज करता येतील. अर्ज करण्याची मुदत 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर अशी आहे.
 
 


Edited by - Priya Dixit