गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑगस्ट 2023 (17:34 IST)

Beed : बीडमध्ये विधवा महिलेवर धावत्या जीप मध्ये सामूहिक बलात्कार

rape
बीड जिल्ह्यातून एका विधवा महिलेवर तिच्या प्रियकरासमोर धावत्या जीप मध्ये दोघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार 4 ऑगस्ट रोजी घडली आहे. या प्रकरणात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
बीडच्या शिवाजी नगर पोलिसांत एका 26 वर्षीय पीडितेने तक्रार नोंदवली असून या महिलेच्या पतीचे निधन पाच वर्षांपूर्वी झाले असून ती आपल्या तीन वर्षाच्या मुलीसह राहते. तिची मैत्री बीड तालुक्यातील सात्रापोत्राच्या सुरेश नामदेव लंबाटेशी झाली नंतर त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले आणि ती आपल्या मुलीसोबत सुरेश सोबत गेल्या वर्षांपासून बीड मध्ये राहते.  
 
4 ऑगस्ट रोजी ती पायी जात असताना तिच्या बाजूला एक जीप येऊन थांबली आणि त्यातून सुरेश खाली उताराला आणि त्याने तिला गाडीत बसायला सांगितले. 
 
गाडीत आधीच सुरेशचा भाऊ अमोल नामदेव लंबाटे आणि बापूराव हावळे बसलेले होते.ती गाडीत बसली काहीच अंतरावर गेल्यावर अमोल ने तिला लाथाबुक्क्याने आणि चापटाने मारहाण केली आणि तिच्यावर अमोल आणि बापूराव ने सुरेश समोर बलात्कार केला. एवढेच नाही तर पीडित महिलेला सुरेशच्या गावी नेऊन सुरेश आणि तिच्या पत्नी ने गाडीतूनओढून बाहेर काढले आणि सुरेशच्या पत्नी सविताने तिला प्लॅस्टिकच्या पाईपने आणि चपले ने मारहाण केली.  सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळतातच तिची सुटका करून तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 
 
पीडितेने दिलेल्या तक्रारी  वरून सुरेश नामदेव लंबाटे, अमोल नामदेव लंबाटे, बापूराव हावळे आणि सुरेशची पत्नी सविताच्या विरोधात तक्रार दाखल केली असून शिवाजी नगर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit