शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 (08:07 IST)

माणगाव तालुक्यातील दहिवली येथील १५ वर्षीय मुलाचा भाला लागून मृत्यू

death
रायगड जिल्ह्याचा माणगाव तालुक्यातील एका १५ वर्ष वयाच्या मुलाला आयएनटी स्कूल पुरार शाळेच्या मौदानावर भाला फेकीचा सराव सुरु असताना भाला त्याच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला लागून त्याचा मृत्यू झाला. सदरील घटना बुधवार दि. ६ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास आयएनटी इंग्लिश स्कूल पुरार ता. माणगाव येथे घडली.
 
या घटनेची खबर बंडू शिवाजी पवार (वय-३५) रा. नांदवी ता. माणगाव मूळ रा. उटगी जि. सांगली यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेने दहिवली गावासह माणगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. सदर घटनेबाबत गोरेगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील मयत मुलगा हुजेफा कुदबुद्दिन डावरे (वय-१५) रा. दाहिवली ता. माणगाव हा आयएनटी शाळेच्या विद्यार्थी असून शाळेच्या आवारात भाला फेकचा सराव सुरू असताना त्याच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला भाला लागून तो गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचाराकरिता प्राथमिक रुग्णालय गोरेगाव येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून तो मयत झाल्याचे सांगितले.
 
या घटनेची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. नं. १९/२०२३ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार एस. जी. खंदारे हे करीत आहेत.