Bhiwandi : भिवंडीत झोपेतच कुटुंबावर काळाचा घाला, स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू
भिवंडी शहरात काही इमारती धोकादायक झाल्याचा प्रश्न गंभीर होत आहे. भिवंडी महानगरपालिका हद्दीत अनेक धोकादायक इमारती आहेत. या इमारतीमध्ये आजही अनेक नागरिक जीव मुठीत घेऊन राहण्यास आहेत. महापालिकेने अशा इमारतीना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आले असून देखील नागरिक तिथे राहत आहे.
अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता असून गाढ झोपेत असताना एका कुटुंबावर काळाने झडप घातली असून भिवंडीत गौरीपाडा धोबी टाळावा येथील साहिल हॉटेलच्या परिसरात अब्दुल बारी जनाब इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही इमारत 40 वर्षे जुनी आहे.
या इमारतीचा स्लॅब कोसळला त्यात दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण ढिगाऱ्यात दाबले गेले. अग्निशमन दलाने आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन 7 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
ही इमारत 40 वर्षीय जुनी असून धोकादायक आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना असून या इमारतीसाठी पालिकेने नोटीस बजावली होती. शनिवारी मध्यरात्री दोन मजली इमारतीचा मागील भाग कोसळला. इमारतीच्या ढिगाऱ्यात सहा जण अडकले असून दोघांचा मृत्यू झाला. पाच जण जखमी झाले
घटनेची माहिती मिळतातच स्थानिक नागरिकांनी धाव घेत तातडीनं बचाव कार्य सुरु केले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफ चे जवान दाखल झाले असून बचाव कार्य सुरु केले.जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
Edited by - Priya Dixit