शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 23 जुलै 2023 (17:29 IST)

Bhiwandi : भिंवडीत सहाव्या मजल्यावरून खेळताना चिमुकला पडला

delhi building
भिवंडीच्या रोशन बाग येथे सात मजल्याच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून चिमुकला खाली पडला. सुदैवाने त्याचा जीव वाचला.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.भिवंडी शहरात रोशनबाग परिसरात गोल्डन हॉटेल जवळ जिलानी कॉम्प्लेक्समध्ये सात मजली इमारत आहे. या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून 12 वर्षाच्या मुलाचा पाय घसरून खाली पडला. इर्शाद अहमद खान असे या मुलाचे नाव आहे.

संध्याकाळच्या वेळी हा आपल्या मित्रांसोबत खेळत असताना.सहाव्या मजल्यावर गँलरी चे  काम अपूर्ण असल्याने त्याचा तोल जाऊन तो खाली रिक्षावर जाऊन पडला.डल्यावर आवाज देखील खूप मोठा आला. त्याने स्थानिकांनी गोधंळ घालायला सुरु केला. परिसरात कळताच लोकांनी गर्दी करायला सुरु केली.

रिक्षावर पडल्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे.त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.या घटनेची भोईवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस या संपूर्ण घटनेची चौकशी करत आहेत.


Edited by - Priya Dixit