शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 9 जुलै 2023 (13:03 IST)

चिमुकल्याला घेऊन रिक्षा चालवणारी आईचा व्हिडीओ व्हायरल

आई आपल्या बाळासाठी काहीही करू शकते.आई सारखं दैवत जगात नाही. आई आणि बाळाचं नातं काही वेगळंच आहे. आपल्या लेकरांच्या सुखासाठी आई काहीही करू शकते. त्याच्या सुखासाठी कितीही संघर्ष करते. सध्या आई आणि तिच्या बाळाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्या लहान तान्ह्या लेकराला कुशीत घेऊन इ रिक्षा चालवत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हृदयस्पर्शी आहे. 
व्हायरल भियानी या  ट्विटर आणि इंस्टाग्राम वर सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये एक आई रिक्षा चालवत प्रवाशांशी संवाद साधत आहे. तिच्या कुशीत तिचे तान्हेबाळ आहे.या आईला आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने व्हायरल भयानी या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला पसंत केले असून लाखो व्युज ह्याला मिळाले आहे. या मातेच्या जिद्देला नेटकऱ्यानी सलाम  करत या मातेचे कौतुक केले आहे
 
Edited by - Priya Dixit