मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जुलै 2023 (21:08 IST)

नाशिक: शेतात अभ्यास करताना चिमुकल्याला चावला कोब्रा अन्….

मालेगाव तालुक्यातील वजीरखेडे येथील एक आठ वर्षांचा मुलगा त्यांच्या शेतातील घरी अभ्यास करत असताना, त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीला साप चावला. आईने, शेजारी शेवाळे यांना मदतीसाठी हाक मारली आणि त्यांनी मुलाला उचलून डॉ. वीरेंद्र पाटील यांनी सांगितल्या प्रमाणे सिव्हिल हॉस्पिटल, मालेगाव येथे धाव घेतली. तात्काळ व योग्य उपचारांमुळे कोब्रा चावलेल्या मुलाचे प्राण वाचले.
 
सुदैवाने बालरोगतज्ज्ञ डॉ. अभय पोतदार ते तिथे उपस्थित होते. त्यांनी ताबडतोब बाळाला इंनक्युबेट करून, सर्प दंशवरी  औषध निओस्टिग्माइन सुरू केले आणि त्यानंतर बाळाला मालेगाव येथील खासगी रुग्णालय प्रयास हॉस्पिटल येथे व्हेंटिलेटर आणि पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
 
दरम्यान डॉ. पियुष रणभोर यांनी पुढील उपचार सुरु केला, परंतु नातेवाईक खूप चिंताग्रस्त असल्यामुळे सुमारे १ वर्षापूर्वी कुटुंबातील एका मुलाचा साप चावल्यामुळे मृत्यू झाला आणि मुलाला नाशिक येथील रुग्णालयात हलवण्याचा आग्रह धरला.
 
त्याप्रमाणे डॉ. रणभोर यांनी संपर्क साधून मुलाला नाशिकच्या साफल्य हॉस्पिटलमध्ये पाठवले; वाहतुकीदरम्यान मुलाला ASV आणि इतर उपचार सुरू राहील याची खात्री त्यांनी केली.
 
साफल्य रुग्णालयात, मुलाला यांत्रिक व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि त्याला ASV, आणि इतर सहाय्यक उपचार देण्यात आले. तीन दिवसांच्या स्थिरीकरणानंतर आणि २० ASV vial मिळाल्यानंतर, मुलाला व्हेंटिलेटर वरून बाहेर काढण्यात आले. सोबतच त्याच्या दंशामुळे झालेल्या जखमेची काळजी घेण्यात आली आणि कंपार्टमेंट सिंड्रोम वगळण्यासाठी डॉ. सतीश कापडणीस यांना दाखवले. बोटाच्या टोकाच्या परफ्युजनवर बारीक लक्ष ठेवून जखमेसाठी काळजी घेण्यात आली.
 
मशीन वरून काढल्यानंतर बाळाला पुन्हा दुसऱ्या दिवशी, त्याला पुन्हा त्रास आणखी १० ASV कुपी देण्यात आल्या. मुलाने उपचाराला चांगल्या स्वरूपात प्रतिसाद दिला. त्याला नंतर ३ दिवसांच्या निरीक्षणानंतर मुलासह कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आनंदी आणि हसऱ्या चेहऱ्याने मुलाला घरी सोडण्यात आले. मुलाला ASV च्या एकूण ४१ कुपी मिळाल्या.
 
मालेगाव व नाशिकमधील सर्व डॉक्टरांचे सहकार्य, रुग्णवाहीका चालक , तसेच सिव्हिल, प्रयास आणि साफाल्यमधील नर्सिंग स्टाफ आणि इतर कर्मचारी यांना विसरून चालणार नाही, तसेच पालकांनी आमच्यावर दर्शविलेला विश्वास यामुळे रुग्णाचा जीव वाचला आहे, असे साफल्य हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरचे डॉ.अभिजीत सांगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor