गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जुलै 2023 (18:33 IST)

नाशिकमध्ये अजित पवार समर्थक आक्रमक,NCP चे कार्यालय ताब्यात घेतले, समर्थकांमध्ये राडा

ajit panwar
Ajit Pawar: नाशिक मध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा झाला नाशिक शहरात मुंबई नाका परिसरात राष्ट्रवादी भवन कार्यालयासमोर गोंधळ निर्माण झाला आहे. कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले असून दोन्ही गटांकडून मोठी घोषणा करण्यात आली. या मुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि छगन भुजबळ राज्य सरकार मध्ये शामिल  झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या पक्षात मोठा वाद निर्माण झाले आहे. दोन्ही गटात याचा परिणाम दिसून आला असून आज सकाळी अजित पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवन कार्यालयाचा ताबा घेतला. आज या भवनात शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार असून शरद पवार यांच्या गटातील काही नेते जमले होते.या कार्यालयात भुजबळ गटाचे कार्यकर्त्ये जमले होते. अजित पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांना कार्यालयाचा बाहेर काढले.त्यामुळे दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली. या मुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.  
परिसरात पोलिसांचा फौजफाटा जमला असून परिस्थितीला नियंत्रणात घेण्याचं काम सुरु आहे. 
 
  Edited by - Priya Dixit