शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जुलै 2023 (07:47 IST)

अजित पवारांचा फक्त फुटीर गट

Jitendra Awhad
मुंबई : अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. अजित पवार यांनी केलेल्या नियुक्त्या कायदेशीर आहेत का, असा सवाल केला. शरद पवार यांना तुम्ही अध्यक्ष मानता, मग त्यांनी घेतलेले निर्णय तुम्हाला मान्य आहेत का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. तसेच अजित पवारांचा फक्त फुटीर गट आहे. त्यामुळे त्यांना फक्त इतर पक्षात विलीन होता येते, असे आव्हाड म्हणाले.
 
शरद पवार यांना अध्यक्ष मानता. मग सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर त्यांनी केलेली कारवाई मान्य करणार का, असा सवाल करीत आव्हाड यांनी शरद पवार अध्यक्ष आहेत. त्यांनी जयंत पाटील यांची नियुक्ती केली आहे, असे म्हटले.अजित पवारांनी केलेल्या नियुक्त्या कायदेशीर आहेत का? शरद पवार अध्यक्ष आहेत. मग यांनी केलेल्या नियुक्त्या घटनात्मक कशा, पक्षाची मान्यता नाही त्यांना नियुक्त्या करण्याचा अधिकार नाही. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित केले आहे, त्यांना कोणतेच अधिकार नाहीत. अजित पवारांची पत्रकार परिषद किटी पार्टी होती, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
 
त्यांनी वाटलेल्या पदांना संविधानिक मान्यता नाही
सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान विविध पदे वाटली. पण त्यांना संविधानिक मान्यता नाही. एकच राष्ट्रवादी पक्ष आहे, त्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. अध्यक्षांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना निलंबित केले आहे. त्यामुळे त्यांना कोणालाही नियुक्त करता येत नाही, असे आव्हाड म्हणाले.