शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 जुलै 2023 (22:06 IST)

प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांना मुक्त करतो. त्यांच्या जागी सुनिल तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त

ajit pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मी जयंत पाटलांना अधिकृतरित्या कळवलं आहे की, प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांना मुक्त करतो. त्यांच्याजागी सुनिल तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहे. अपात्रतेची कारवाई पक्षाद्वारे होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाकडे याचा अधिकार नाही.”
 
“अजित पवार यांची विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात येत आहे. अनिल पाटील यांनाच ठेवण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून कळवलं आहे,” असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
 
यावेळी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार असा सवाल विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, “राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत, आपण विसरलात का?”
 
Edited By - Ratnadeep Ranshoor